Sangvi : विनामास्क फिरणा-यांवर कारवाई करणा-या तीन पोलिसांना धक्काबुक्की; दोघांना अटक

एमपीसी न्यूज – विनामास्क फिरणा-यांवर कारवाई करत असलेल्या पोलिसांना शिवीगाळ करत धक्काबुक्की करून त्यांच्या कामात अडथळा आणला. ही घटना मंगळवारी (दि. 3) रात्री सव्वासात वाजता शिवार चौक, पिंपळे सौदागर येथे घडली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली.

अभिषेक राजू टेंकल (वय 18, रा. शिवाजीनगर, पुणे), हरीश गणेश कांबळे (वय 18, रा. .शिवाजीनगर रेल्वे स्टेशन जवळ, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीस नाईक नवनाथ नानाभाऊ बनकर यांनी मंगळवारी (दि. 3) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनामास्क फिरणा-यांवर तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणा-यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. फिर्यादी पोलीस नाईक बनकर, त्यांचे सहकारी पोलीस नाईक केदारी, पोलीस हवालदार असवले असे तिघेजण पिंपळे सौदागर येथील शिवार चौकात कारवाई करीत होते.

रात्री सव्वासात वाजताच्या सुमारास आरोपी मोपेड दुचाकीवरून (एम एच 12 / एन क्यू 5145) आले. दोघा आरोपींनी पोलिसांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तसेच पोलिसांच्या अंगावर धावून जात पोलिसांच्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला.

आरोपी हरीश कांबळे यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. सांगवी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.