Bhosari News : अतिरेकी हल्ल्यामध्ये शहीद झालेले पोलीस अधिकारी यांच्या स्मरणार्थ पुष्पचक्र समर्पण

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय सैनिक संस्था आणि प्रांत पोलीस संघ यांचे संयुक्त विद्यमाने 26/11/2008 रोजी मुंबईवर झालेल्या अतिरेकी भ्याड हल्ल्यामध्ये (Bhosari News) शहीद झालेले सैन्य दलातील, पोलीस दलातील अधिकारी, जवान आणि निष्पाप नागरीक यांच्या स्मरणार्थ पुष्पचक्र समर्पण व कॅण्डल मार्च काढण्यात आला.

हा कार्यक्रम भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे राष्ट्रीय सैनिक संस्थेचे अध्यक्ष प्रताप भोसले यांचे संकल्पनेतून झाला. 26/11 च्या प्रति हल्ल्यामध्ये प्रत्यक्ष सहभागी असलेले पॅरा कमांडो रमेश पाटील हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. राष्ट्रीय सैनिक संस्था, लायन्स क्लब, प्रांत पोलीस संघ कमांड स्पेशल फोर्स आणि एनसीसी चे पदाधिकारी यांनी पुष्पचक्र समर्पण केले. लष्करी थाटात हा नागरी सोहळा पुष्पचक्र समर्पण करून त्यानंतर कॅन्डल मार्च केला गेला. 2 महाराष्ट्र बटालियनचे प्रो. रामकृष्ण मोरे कॉलेजचे एनसीसी कॅडेट्स यांनी गार्ड ऑफ ऑनर तसेच पुष्पचक्र समर्पण संचालन केले.

Pune News : लॉयला आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा, लॉयला प्रशालेने तीनही वयोगटात मिळवला विजय

सामाजिक कार्याची जाणीव राष्ट्रीय सैनिक संस्था आणि प्रांत पोलीस संघ यांनी ठेवली याबद्दल परिमंडल एकचे उपायुक्त  विवेक पाटील यांनी विशेष प्रशंसा केली.(Bhosari News) संस्थेच्या महासचिव सौ. शुभांगी सरोते आणि कमांड स्पेशल फोर्सचे कमांडर दादासाहेब सावंत यांनी सर्वांचे आभार मानले. राष्ट्रीय सैनिक संस्था पदाधिकारी स्मिता माने आणि किशोरी अग्निहोत्री यांनी सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.