Pushpatai Bhave: जेष्ठ सामाजिक कार्यरकर्त्या आणि लेखिका पुष्पाताई भावे यांचे निधन

एमपीसी न्यूज – जेष्ठ सामाजिक कार्यरकर्त्या आणि लेखिका प्रा. पुष्पाताई भावे (81) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. मागील काही दिवसांपासुन खूप आजारी होत्या. प्रभावी वक्त्या,परखड समीक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्या अशी त्यांची ओळख होती. 

विचारवंत आणि लेखिका प्रा. भावे यांचा विद्यार्थिदशेपासूनच राष्ट्र सेवा दल आणि लोकशाहीवादी चळवळींशी संपर्क होता. मराठी व संस्कृत हे विषय घेऊन त्यांनी मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजातून एम.ए. ची पदवी प्राप्त केली आणि मुंबईतच सिडनहॅम महाविद्यालयात त्या प्राध्यापक म्हणून रूजू झाल्या. पुरोगामी विचारसरणी आणि पक्की वैचारिक बैठक असलेल्या पुष्पाताई यांनी गेल्या पाच-सहा दशकांतील सगळ्या प्रगतिशील चळवळींशी जोडून घेऊन काम केले.

संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन, दलित पँथरची चळवळ, एक गाव एक पाणवठा चळवळ, हमाल पंचायत, देवदासी मुक्ती अशा विविध चळवळींमध्ये योगदान देतानाच शेतकरी, कामगार, अदिवासी, दलित आदी घटकांच्या लढ्यामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग दिला. तसेच त्या उत्तम लेखिका सुद्धा होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.