Talegaon Dabhade News : विकासासाठी राजकीय जोडे बाजूला ठेऊन एकदिलाने काम करा; आमदार सुनील शेळके यांचे आवाहन

एमपीसी न्यूज – जुन्या लोकप्रतिनिधींचे मार्गदर्शन घेऊन नव्या नगरसेवकांनी शहर विकासाला योगदान द्यावे. विकासासाठी राजकीय जोडेबाजूला ठेवून सर्वांनी एकदिलाने काम करावे, असे आवाहन मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केले. तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या इमारतीच्या वास्तुविसर्जनाचे निमित्त साधून नगरपरिषदेत 46 वर्षांच्या साक्षीदारांचा कर्तव्य कृतज्ञता मेळावा करण्यात आला. त्यात सर्वपक्षीय माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवकांसह कर्मचारी एका व्यासपीठावर एकत्र जमले होते, त्यावेळी आमदार सुनील शेळके बोलत होते.

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष बाळासाहेब जांभूळकर, अंजलीराजे दाभाडे, ॲड. रवींद्रनाथ दाभाडे, सुरेश चौधरी, कृष्णा कारके, उमाकांत कुलकर्णी, राजेंद्र पोळ, सुरेश धोत्रे, मीरा फल्ले, ॲड. रंजना भोसले, माया भेगडे, शालिनी खळदे, चित्रा जगनाडे तसेच माजी उपनगराध्यक्ष सत्येंद्रराजे दाभाडे, नगरसेवक गणेश खांडगे,गणेश काकडे यांच्यासह ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

आमदार सुनील शेळके म्हणाले की, जुन्या लोकप्रतिनिधींचे मार्गदर्शन घेऊन नव्या नगरसेवकांनी शहर विकासाला योगदान द्यावे. विकासासाठी राजकीय जोडेबाजूला ठेवून सर्वांनी एकदिलाने काम करावे. कधीकाळी नाकारले जात असलेले उपनगराध्यक्ष मिळवण्यासाठी भांडलो, त्यामुळेच तर आमदार होऊ शकलो. येत्या दोन वर्षांत नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे काम पूर्ण करून लोकार्पण करणार असल्याचे आश्वासित केले.

तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या इमारतीच्या वास्तुविसर्जनाचे निमित्त साधून नगरपरिषदेत ४६ वर्षांच्या साक्षीदारांचा कर्तव्य कृतज्ञता मेळावा करण्यात आला. त्यात सर्वपक्षीय माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवकांसह कर्मचारी एका व्यासपीठावर एकत्र जमलेले पहावयास मिळाले.तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या कामासाठी अस्तित्वातील इमारत पाडली जाणार आहे.जुनी इमारत पाडण्यापूर्वी मेळाव्याच्या निमित्ताने या कार्यालयातील गेल्या 46 वर्षांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या संकल्पनेतून नगरपरिषद प्रशासनाकडून मंगळवारी (दि.17) सकाळी कर्तव्य कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

ॲड. रवींद्र दाभाडे, कृष्णा कारके, अंजलीराजे दाभाडे, ॲड.रंजना भोसले या माजी नगराध्यक्षांनी मनोगत व्यक्त करताना आपल्या कारकिर्दीतील आठवणींना उजाळा दिला. माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवकांसह, कर्मचाऱ्यांसह तीनशेहून अधिक निमंत्रित या मेळाव्यास उपस्थित होते.

नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी प्रास्ताविक केले तर अ‍ॅड रंजना भोसले यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.