Thergaon News : कचरा घंटागाडी किंवा कचरा कुंडीतच टाका, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका; महापालिकेकडून जनजागृती

एमपीसी न्यूज – “आमचे ध्येय शून्य कचरा”, “कचरा घंटागाडी किंवा कचरा कुंडीतच टाका”, “आपले पिंपरी-चिंचवड शहर सुंदर शहर बनवूया”, “उघड्यावर कचरा टाकणे व सार्वजनिक थुंकणे पासून मुक्ती” असे फलक हातामध्ये घेत महापालिकेच्या ग क्षेत्रीय कार्यालय हद्दीत जनजागृती करण्यात आली.

पालिकेच्या प्रभाग क्रमांक 24 डांगे चौक बाजारपेठेत नागरिकांना व दुकानदारांना रस्त्यावर कचरा टाकू नका सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका याबाबत फलकद्वारे संदेश देऊन जनजागृती करण्यात आलेली आहे. ग क्षेत्रीय कार्यालय प्रभागात  स्वच्छ भारत अभियानांतर्गत “स्वच्छता संकल्प देश का, हर रविवार विशेष सा, Littering and spitting se Aazadi स्पेशल रविवार या शिर्षकाखाली, डांगेचौक, बाजारपेठ, वाकडरोड, शिवकाॅलनी, GVP पाॅईंट शनी मंदिर येथे रांगोळी काढून, सुशोभिकरण, झाडांच्या कुंडयालावल्या होत्या. नागरिकांना उघड्यावर कचरा टाकणे व थुंकणे पासुन मुक्ती या विषयावर आरोग्य निरीक्षक सुरेश चन्नाल  यांनी मार्गदर्शन केले.

या स्वच्छता मोहिमेत ग प्रभाग क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय आधिकारी   श्रीनिवास दांगट, सहाय्यक आरोग्य आधिकारी राजु बेद, मुख्य आरोग्य निरीक्षक वसंत सरोदे , आरोग्य निरीक्षक सुरेश चन्नाल यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सहाय्यक संतोष ओव्हळ,  कर्मचारी अरुण राऊत,प्रशांत पवार, अनिल डोंगरे,सूर्यकांत चाबुकस्वार,व सर्व ठेकेदार कामगार व नागरिक यांनी सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.