Pimpri : अण्णासाहेब मगर सोशल-स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे विविध क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव

एमपीसी न्यूज – अण्णासाहेब मगर सोशल-स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या गुणवंतांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार (दि. 18) रोजी सकाळी अकरा वाजता कामगार कल्याण मैदान, भोईर नगर येथे होणार आहे. सिनेअभिनेते मकरंद अनांसपुरे आणि हास्य सम्राट दीपक देशपांडे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गुलाब बिरदवडे यांनी दिली.

पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी खासदार श्रीरंग बारणे, अमर साबळे, महापूर राहुल जाधव, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, नगरसेवक शीतल शिंदे, जयश्री गावडे, शैलेंद्र मोरे, भाऊसाहेब भोईर, सुजित पाटील आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार लालासाहेब शिंदे यांना प्रदान करण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड भूषण इंद्रमण सिंह, पिंपरी चिंचवड युवा भूषण कैलास काटे, कार्यक्षम नगरसेविका माधुरी कुलकर्णी, कार्यक्षम नगरसेवक संजय वाबळे, बांधकाम भूषण अशोक माने, सुरेश मोटे, सुरेंद्र अग्रवाल, समाजभूषण पोपटराव पिंगळे, हेड एच आर फोर्स मोटर्स लि. रामचंद्र होनप, शैक्षणिक भूषण एस डी भालेकर, सहकार भूषण मनीषा कुदळे, युवा भूषण हर्षवर्धन भोईर, उत्कृष्ट वैद्यकीय डॉक्टर संदीप भोसले, युवा उद्योजक निलेश आहेर, उत्कृष्ठ जनरल मॅनेजर आनंद पाटील, महिला भूषण कुंदा भिसे आदींना गौरविण्यात येणार आहे.

तसेच सहकार भूषण अंकुश प-हाड, उत्कृष्ठ दैनिक महाराष्ट्र टाइम्स, उत्कृष्ठ संस्कृती इव्हेंट मॅनेजमेन्ट संस्कृती इव्हेंट, पत्रकार अतुल क्षीरसागर, आशा साळवी, उत्कृष्ठ फॅमिली श्री व सौ भातखंडे, उत्कृष्ठ दिग्दर्शक रमेश चौधरी, उत्कृष्ठ व्यवस्थापक गोपाळ साकला, सामाजिक कार्यकर्ता कृष्णराव अहिरराव, सक्षम अधिकारी सुरेश पवार, उत्कृष्ठ वर्तमानपत्र एजंट शंकर नामदे, वैद्यकीय धार्मिक भूषण डॉ. खासनीस, सामाजिक कार्यकर्ता दत्तात्रय खांबे, प्रदीप दर्शले, सुखदेव खेडकर, पंडित खुरंगळे, गणेश फंड, अशोक वाळुंज, मुकेश चौधरी, उत्कृष्ठ दैनिक विक्रेता राजाराम भुजबळ, उत्कृष्ठ मुकादम प्रकाश गायकवाड यांना देखील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.