Talegaon Dabhade : विद्यार्थीभिमुख शिक्षण ही काळाची गरज- रामदास काकडे

एमपीसी न्यूज – प्रत्येक विद्यार्थी हा क्रीडांगणावर जायला हवा. शिक्षकांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य संतुलित असायला हवे.शिक्षण क्षेत्रातील समकालिन बदलांना सामोरे जाताना विद्यार्थीभिमुख शिक्षण देणे ही काळाची गरज आहे, असे मत इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी व्यक्त केले. इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेची गुणवत्ता सुधारणा बाबतची आढावा बैठक पार पडली. यावेळी काकडे बोलत होते.

येथील शैक्षणिक क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेची गुणवत्ता सुधारणा बाबतची आढावा बैठक नुकतीच पार पडली.संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, बीसीए-बीबीए विभाग आणि औषधनिर्माण शास्त्र(फार्मसी) विभागांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन औषधनिर्माण महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आले होते. इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदासजी काकडे यांनी शिक्षकांना संबोधित केले. याप्रसंगी संस्थेचे कार्यवाह चंद्रकांतजी शेटे, विश्वस्थ संदीप काकडे,युवराज काकडे, संजय साने,निरुपा कानिटकर, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे,फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय आरोटे आदी मान्यवर उपस्थित होते.

पुणे हादरले! सहा जणांकडून कोयत्याने आणि दगड विटांनी मारहाण करून सराईताचा खून

याप्रसंगी उपस्थित शिक्षकवृंदाला संबोधित करताना संस्थेचे अध्यक्ष रामदासजी काकडे म्हणाले की, महाविद्यालयात प्रवेश घेणारा प्रत्येक विद्यार्थी हा ग्राहक समजावा आणि त्याला त्याच्या मागणीनुसार योग्य तो पुरवठा केला तर तयार होणारे ‘प्रोडक्ट’ हे निश्चितच उच्च दर्जाचे तयार होईल आणि यासाठी शिक्षक वर्गाने तत्पर असणे गरजेचे आहे. प्रत्येक विद्यार्थी हा क्रीडांगणावर जायला हवा अशी अपेक्षा व्यक्त करत काकडे यांनी शिक्षकांचे शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य संतुलित असायला हवे असे सांगितले. समकालिन बदलांना सामोरे जाताना विद्यार्थीभिमुख शिक्षण देणे ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी लागणारे प्रशिक्षण आणि अन्य साधने पुरविण्यासाठी संस्था कटिबद्ध असल्याचे सांगितले.

सभेचे स्वागत व प्रास्ताविक इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संभाजी मलघे यांनी केले. महाविद्यालयीन भौतिक सोयी सुविधा वाढत असतानाच गुणवता वाढविणे आणि त्यात सातत्य ठेवणे ही शिक्षकांची जबादारी आहे असे डॉ.मलघे म्हणाले.

उपस्थित शिक्षकवर्गाला मार्गदर्शन करताना संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे म्हणाले की,सर्व विभागांचे कामकाज वेळेत आणि काटेकोरपणे होणे गरजेचे आहे. महाविद्यालयात घडणाऱ्या शैक्षणिक उपक्रमांची माहिती विद्यार्थी आणि समाजापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.शैक्षणिक सोयी पुरविण्यास संस्थेचे नियामक मंडळ सदैव दक्ष आहे, पण शिक्षकवर्ग जर सजग असेल तर येणाऱ्या काळात इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे नाव अजून पुढे जाईल असा विश्वास शेटे यांनी यावेळी व्यक्त केला.गुणवत्तेच्या संदर्भात सुधारणा काय काय असायला हव्यात याचा आढावा घेणाऱ्या अशा स्वरूपाच्या बैठकी वर्षातून ३-४ वेळेस तरी झाल्या पाहिजेत म्हणजे ‘नॅक’ मूल्यांकन, शिक्षक-विद्यार्थ्यांच्या समस्या,भौतिक सोयीसुविधांचा अंतर्भाव अशा अनेक गोष्टींचा ऊहापोह यातून होण्यास मदत होईल.

सभेचे स्वागत प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी केले तर आभार प्रदर्शन फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय आरोटे यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील विविध विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.