Quarantine Center Rescue : दिल्लीच्या तरुणीचा पुण्यातील क्वारऺटाइन सेंटरच्या खिडकीतून पळून जाण्याचा प्रयत्न फोल

एमपीसी न्यूज – सेंट्रल मॉल जवळ, एरंडवणा येथील क्वारंटाइन सेंटर मधील एका तरुणीने दुसऱ्या मजल्यावरील खिडकीच्या गजामधून रात्री 11.30 च्या सुमारास पळून जाण्याचा प्रयत्न केला.

मात्र या प्रयत्नात ही मुलगी खिडकीच्या गजामध्ये अडकली. दिप्ती कुमारी (वय, अंदाजे 18 वर्षे, मूळ रा. दिल्ली) असे मुलीचे नाव आहे.

एरंडवणा अग्निशमन केंद्राचे अधिकारी व जवानांनी तत्परतेने घटनास्थळी धाव घेत घाबरलेल्या मुलीला धीर देत हायड्रॉलिक कटरच्या साह्याने खिडकीचा गज तोडून मुलीची सुखरूप सुटका केली. तसेच तिला महिला सेवा मंडळाच्या व्यवस्थापकांकडे सुपूर्द केले.

यावेळी डेक्कन पोलीस घटनास्थळी हजर होते. एरंडवणा अग्निशमन केंद्राचे स्टेशन ऑफीसर राजेश जगताप यांच्या सहीत सब ऑफीसर संतोष कार्ले प्रभारी तांडेल राजेंद्र पायगुडे,फायरमन राजेंद्र भिलारे, कैलास पवार, निलम शहाणे, मंदार नलावडे, ड्रायव्हर राकेश नाईक नवरे व पांगारे यांनी यावेळी महत्त्वाची भूमिका निभावली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.