Quarantine memories: …तरी देखील करोनाचा विषाणू आमच्या घरात पोचला, असं ‘कोण’ म्हणतंय?

Quarantine memories: ... Even so, the corona virus has reached our house, who says this? बोनी कपूरसह दोन्ही मुली जान्हवी आणि खुशी कपूर यांना स्वत:ला क्वारंटाइन करावे लागले होते. फिल्मफेयरला दिलेल्या मुलाखतीत जान्हवीने या क्वारंटाइनचा अनुभव सांगितला आहे.

एमपीसी न्यूज – करोनाची दहशत फक्त सामान्य माणसांनाच नाही. अगदी सेलिब्रेटी सुद्धा यातून सुटले नाहीत. काहींचे सहायक करोनाग्रस्त झाले. त्यामुळे या सेलिब्रेटींना देखील चक्क क्वारंटाईन व्हावे लागले. बॉलिवूड चित्रपट निर्माते बोनी कपूर यांच्या घरात काम करणाऱ्या व्यक्तींना करोनाची लागण झाली होती. त्यामुळे बोनी कपूरसह दोन्ही मुली जान्हवी आणि खुशी कपूर यांना स्वत:ला क्वारंटाइन करावे लागले होते.

फिल्मफेयरला दिलेल्या मुलाखतीत जान्हवीने या क्वारंटाइनचा अनुभव सांगितला आहे. या काळात तिने स्वत:ची व वडिलांची देखभाल कशी केली याबाबत चाहत्यांना सांगितले आहे. ‘करोनाच्या भीषणतेबाबत इतके दिवस टीव्ही आणि सोशल मीडियाद्वारे ऐकत होतो. परंतु स्वत:च्या घरातच करोनाग्रस्त सापडल्यामुळे आम्ही घाबरलो. कारण घराच्या कुंपणाबाहेर देखील कोणी गेलं नव्हतं. तरी करोना विषाणू आमच्या घरात पोहोचला होता’.

_MPC_DIR_MPU_II

‘या प्रकरणातून आम्हाला सावरायला दोन दिवस लागले. क्वारंटाइनच्या काळात घरातील प्रत्येक जण आपापल्या खोल्यांमध्ये कैद राहायचे. माझ्या वडिलांना रात्री झोपताना गरम पाणी पिण्याची सवय आहे. त्यामुळे हातात ग्लोव्हज आणि तोंडावर मास्क लावून मी त्यांच्याकडे पाणी घेऊन जायचे. घरातील प्रत्येक कर्मचाऱ्याला तोंडावर मास्क लावणं आता अनिवार्य केलं आहे. आता आम्ही स्वच्छतेवर अधिक लक्ष देतोय’, असा अनुभव जान्हवीने या मुलाखतीत सांगितला.

जान्हवीचा  ‘गुंजन सक्सेना- द कारगिल गर्ल’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.  यात ती कारगिल गर्ल गुंजन सक्सेना यांची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे.  गुंजन सक्सेना कारगिल युद्धात लढाऊ विमान उडवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. त्यांच्या साहसाची गाथा या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1