Pune : राम कदम यांची अभिनेत्री सोनाली बेंद्रेला जिवंतपणीच श्रद्धांजली !

एमपीसी न्यूज – दहीहंडी उत्सवाच्या वादगस्त विधानावरुन आधीच अडचणीत आलेले भाजपचे आमदार राम कदम पुन्हा आपल्या चुकीच्या ट्विटमुळे संकटात सापडले आहे. भाजप आमदार राम कदम यांनी आज ट्विटरवरून अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांना श्रद्धांजली वाहत आणखी एक वाद ओढवून घेतला आहे. वादग्रस्त वक्तव्याने मुक्ताफळं उधळणाऱ्या राम कदम या ट्विटमुळे आता अडचणीत आले आहेत. परदेशात उपचारासाठी गेलेल्या अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या निधनाचे फेक ट्विट त्यांनी केले.

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या हायग्रीड कॅन्सरशी झूंज देत असून तिच्यावर न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरु आहेत. सोनाली आणि तिचा नवरा गोल्डी बहल सोशल मीडियावरून तिच्या प्रकृतीची माहिती देत असतात. ही बातमी कळताच चाहते सोनालीच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. अशातच सोशल मीडियावर सोनाली बेंद्रेच्या निधनाची अफवा पसरली आहे. हे ट्विट चुकीचं असल्याचं लक्षात येताच ते डिलीट करण्यात आलं पण, स्क्रीनशॉटच्या माध्यमातून मात्र सध्या ते बरंच व्हायरल झालं असून, आता त्यांच्यावर अनेकांचाच रोष ओढावला आहे.

_MPC_DIR_MPU_II

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.