Akurdi Crime News : भिशीचा हिशोब विचारल्याने जातिवाचक शिवीगाळ, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल 

एमपीसी न्यूज – भिशीचा हिशोब विचारल्याने जातिवाचक शिवीगाळ केली. तसेच, तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जय गणेश व्हिजन, आकुर्डी येथील ओम फायनान्स येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी दोन जणांविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी सचिन चंद्रकांत अवसरमल (वय 27, रा. वराडे फाटा, तळेगाव दाभाडे) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुदाम दगडू आमटे (वय 44) आणि जनार्दन दगडू आमटे (वय 35) या दोन जणांविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन हे आरोपी यांना भिशीचा हिशोब विचारण्यासाठी गेले असता त्यांना जातिवाचक शिवीगाळ केली. तसेच, कॉलर पकडून ऑफिसच्या बाहेर काढले. आणि तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली असे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.