Pimpri : एम्पायर इस्टेट पुलाजवळ राडारोडा; महामार्गावरील वाहतुकीस अडथळा

एमपीसी न्यूज – चिंचवडमधील एम्पायर इस्टेट पुलाजवळ बांधकामाचा राडारोडा पडला आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. उड्डाणपुलाजवळ एका पुलाचे काम मागील अनेक महिन्यांपासून सुरु असल्याने महामार्गावरील काही भाग झाकला आहे.

चिंचवड येथील एम्पायर इस्टेट पुलाजवळ महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी महामार्ग ओलांडण्यासाठी पादचारी पूल बांधण्यात येणार आहे. मागील अनेक महिन्यांपासून या पुलाचे बांधकाम सुरु आहे. त्यातच मेट्रोचे देखील काम याभागात सुरु आहे. खांबांच्या बांधकामासाठी लागणारे साहित्य रस्त्यावर पडले असून त्यासाठी रस्त्याचा काही भाग झाकण्यात आला आहे. झाकलेल्या भागात राडारोडा आणि दिशादर्शक फलक पडले आहेत.

पुणे-मुंबई जुना महामार्गावर हे चित्र असून दोन्ही मार्गावरील रस्त्याचा काही भाग झाकण्यात आला आहे. यामुळे या भागातून वाहने चालवताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या मार्गावरून भरधाव वेगात वाहने जात असतात. एखादे वाहन या राडारोड्यात अडकून मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. पादचारी पुलाचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरु आहे. हे काम काही केल्या पूर्ण होत नसून प्रशासन देखील याकडे कानाडोळा करीत आहे. तसेच महामार्गावरील दुभाजकावर बसवण्यात आलेली जाळीची देखील पडझड झाली आहे. यामुळे देखील  होण्याची शक्यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.