Snooker Championship : रफत हबीब, पुष्पेंद्र सिंग, इशप्रीत चढ्ढा, सुमित अहुजा, योगेश कुमार, आर. गिरीष यांची विजयी कामगिरी

एमपीसी न्यूज – द क्यु क्लबतर्फे आयोजित स्टरलाईट टेक अखिल भारतीय खुल्या स्नुकर अजिंक्यपद स्पर्धेत रफत हबीब, पुष्पेंद्र सिंग, इशप्रीत चढ्ढा, सुमित अहुजा, योगेश कुमार, आर.गिरीष यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून स्पर्धेत विजयी कामगिरी केली.

वडगांव-शेरी येथील द क्यु क्लबमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेच्या मुख्य ड्रॉच्या गटसाखळी फेरीत अ गटाच्या सामन्यात इशप्रीत चढ्ढा याने विश्‍वजीत मोहन याचा 3-0 असा धुव्वा उडविला. इशप्रीत याने सामन्यात वर्चस्व राखताना 76 आणि 44 गुणांचे दोन मोठे ब्रेकही नोंदविले. इशप्रीत याने पहिल्या फ्रेममध्ये 76 गुणांचा तर, दुसर्‍या फ्रेममध्ये 44 गुणांचा  ब्रेक नोंदवित 92-16 आणि 69-22 अशा दोन्ही फ्रेम जिंकत 2-0 अशी आघाडी घेतली.तिसरी फ्रेम 84 – 14 अशी एकतर्फी जिंकून सामना खिशात घातला. ब गटाच्या सामन्यात आर.गिरीष याने मोहसिन अछावा याचा 65-39, 55-22, 54-37 असा सहज पराभव केला.

फ गटाच्या सामन्यात रफत हबीब याने विशाल राजानी याचा 63 – 15, 60 – 20, 25 – 64, 68 – 34 असा पराभव करून आगेकूच केली.याच गटामध्ये पुष्पेंद्र सिंग याने के. वैंकटेशम याचा 19 – 101(57), 63 -16, 72 – 20, 77- 06 असा पराभव केला.के. वैंकटेशम याने पहिल्या फ्रेममध्ये 57 गुणांचा ब्रेक नोंदविला होता. पण त्यानंतरच्या खेळात तो सातत्या राखू शकला नाही आणि सामन्यात पराभव स्विकारावा लागला.

ज गटात सुमित अहुजा याने मोहम्मद अली हुसेन याचा 63 – 50, 60 – 05, 02 – 76,59 – 33 असा पराभव केला. ड गटाच्या सामन्यात योगेश कुमार याने विजय निचानी याचा 82 – 35, 28 – 64, 63 – 44, 66 – 10 असा पराभव केला.

सामन्यांचे निकालः मुख्य ड्रॉः गटसाखळी फेरीः

गट फः रफत हबीब वि.वि. विशाल राजानी 63 – 15, 60 – 20, 25 – 64, 68 – 34;
गट फः पुष्पेंद्र सिंग वि.वि. के. वैंकटेशम 19 – 101( 57 ), 63 – 16, 72 – 20, 77- 06;
गट अः इशप्रीत चढ्ढा वि.वि. विश्‍वजीत मोहन 92 (76) – 16, 69 (44) – 22, 84 – 14;
गट जः सुमित अहुजा वि.वि. मोहम्मद अली हुसेन 63 – 50, 60 – 05, 02- 76, 59 – 33;
गट डः योगेश कुमार वि.वि. विजय निचानी 82 – 35, 28 – 64, 63 – 44, 66 – 10;
गट बः आर. गिरीष वि.वि. मोहसिन अछावा 65 – 39, 55 – 22, 54 – 37;

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.