Rahat Indori Dies: ‘बुलाती है मगर जाने का नहीं’ प्रख्यात गझलकार राहत इंदौरी यांचं निधन

एमपीसी न्यूज – प्रख्यात गझलकार आणि गीतकार राहत इंदौरी (70) यांचं निधन झालं आहे. मध्य प्रदेशातील इंदौरमधल्या रुग्णालयात त्यांना रविवारी दाखल करण्यात आलं होतं. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. इंदौरी यांना आज दोनदा हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली.

रुग्णालयात दाखल केल्यानंतर राहत इंदौरी यांनी ट्विट करत सांगितलं होतं, कोविडची प्राथमिक लक्षणे दिसू लागताच माझी करोना चाचणी करण्यात आली. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मला अरविंदो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या आजाराचा मी लवकरात लवकर पराभव करावा, अशी प्रार्थना करा. आणखी एक विनंती आहे, मला किंवा माझ्या कुटुंबीयांना फोन करु नका, माझ्या प्रकृतीची माहिती ट्विटर आणि फेसबुकवर मिळेल असे ते म्हणाले होते.

राहत इंदौरी हे प्रसिद्ध शायर तर होतेच, शिवाय त्यांनी बॉलिवूडसाठीही अनेक गाणी लिहिली आहेत. इश्क, मिशन काश्मीर, मुन्नाभाई एमबीबीएस, मर्डर अशा अनेक चित्रपटांची गाणी राहत इंदौरी यांनी लिहिली आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.