Rahatani : अवघ्या पंधरा मिनिटात घरातून अडीच तोळ्याचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज – बंद घराच्या दरवाज्याची कडी तोडून अवघ्या पंधरा मिनीटात घरातील अडिच तोळ्याचे दागिने चोरीला गेले आहेत. हा प्रकार रविवारी (दि.2) रात्री साडे अकरा ते पावणे बाराच्या दरम्यान रहाटणी (Rahatani) येथील शिवराज नगर येथे घडला.

याप्रकरणी अशोक कुमार राजेंद्र प्रजापती (वय 34 रा.रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chakan Crime : चाकण येथे 82 हजार रुपयांची घरफोडी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर बंद असताना चोरट्यांनी (Rahatani) अवघ्या 15 मिनिटांत घराच्या कपाटामधील 70 हजार रुपयांचे 28 ग्रॅम वजनाचे दागिने चोरून नेले आहेत. यावरून वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.