Rahatani : न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडियम स्कूल’चा 100 टक्के निकाल

एमपीसी न्यूज- रहाटणी येथील न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडियम (Rahatani) स्कूलचा (एस. एस. सी.) स्टेट बोर्डचा दहावीचा निकाल 100 टक्के लागला आहे. यात दानिश रजा (82 टक्के) शिवादेवी तिवारी (81 टक्के), वैष्णवी गवळी (80 टक्के), प्राप्त केले आहेत. तर गुणवत्ता यादीमध्ये 16 मुलांनी विशेष प्रावीण्य मिळवले.
या विद्यार्थ्यांचा शंभर टक्के निकाल आणण्यासाठी शाळेचे उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन प्राचार्य नाजनीन शेख यांनी केले. संस्थचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन (Rahatani) केले.