Rahatani  : ‘रन फॉर भीमथोन’द्वारे शांती, प्रेम, करुणेचा संदेश

एमपीसी न्यूज – क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशनच्या (Rahatani )वतीने छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या संयुक्त जयंती महोत्सवा निमित्त ‘रन फॉर भीमथोन’ ही अर्ध मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. ही स्पर्धा बाल आनंद मेळावा छत्रपती संभाजी महाराज उद्यान समोर कोकणे चौक रहाटणी या ठिकाणी पार पडली.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे खासदार श्रीरंग बारणे, माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे, (Rahatani )माजी क्रीडा सभापती चंद्रकांत नखाते, माजी महिला बाल विकास सभापती निर्मला कुटे, उन्नती फौंडेशनचे संजय भिसे, संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, सचिव संदीप चाबुकस्वार यांच्या हस्ते उदघाटन झाले.
या वेळी सामाजिक कार्यकर्ते राकेश नखाते, उल्हास कोकणे, डॉ. संग्राम नागणे, कैलाश कुंजीर, प्रदीप दळवी, काळुराम कवितके, राजेश भालेराव, पुरषोत्तम गाणार, अमित भालेराव, शशी जाधव, वैभव शिनगारे, मयुर ओव्हाळ, मोसीन अन्सारी, युवराज प्रगणे, शाळेच्या मुख्याध्यापिका नाजमीन शेख, उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

अर्ध मॅरेथॉन स्पर्धा छत्रपती संभाजी महाराज उद्यान – बळीराज चौक – छत्रपती शिवाजी महाराज चौक – महादेव मंदिर – पि.के चौक – कोकणे चौक ह्या मार्गाने झाली असून 340 स्पर्धकानी भाग घेतला. ही स्पर्धा बक्षीसासाठी नसून  शांती, प्रेम, मैत्री आणि करुणेचा संदेश देण्यासाठी आयोजित केली गेली. सर्व वयोगटातील सहभागींसाठी तीन, पाच किलोमीटर अंतरावर झाली. प्रत्येकाला टी-शर्ट, चहा, पाणी, नाश्ता तसेच रुग्णवाहिका आपत्कालीन सेवा व डॉक्टर, परिचारिका उपलब्ध करून देण्यात आली.
बाल आनंद मेलाव्यामुळे सर्व बाल गोपालांना धमाल, मजा, मस्ती, मनोरंजन करता आली. अनेकांनी त्याचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संथापक अरुण चाबुकस्वार यांनी केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.