Rahatani: अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची उद्या रहाटणीत सभा

 एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाराम नारायण पाटील यांच्या प्रचारार्थ उद्या मंगळवारी (दि. 22)  अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत जाहीर सभा होणार आहे.

ही सभा रहाटणीतील बळीराज मंगल कार्यालय येथे सायंकाळी सहा वाजता होणार आहे. यावेळी भारीपचे अध्यक्ष देवेंद्र तायडे, प्रवक्ते शाहीर सचिन माळी, एम.आय.एमचे अध्यक्ष अकिल मुजावर, वंचित बहुजन आघाडीचे समन्वय महेंद्रसिंग आदियाल, आदिवासी भटक्या मुक्त जातीचे अध्यक्ष शिंदे महाराज, वंचित  बहुजन  आघाडीच्या स्वाती कदम, गोंधळी समाज प्रदेशाध्यक्ष मारुती कदम, मारुती सोनवणे, सुरेश भालेराव, गुलाब पानपाटील आदी उपस्थित राहणार आहे, अशी माहिती आयोजक अरुण चाबुकस्वार यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.