Rahatani crime news : कामाचे पैसे मागणाऱ्या महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज – कामाचे पैसे मागणा-या महिलेशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. तसेच तिच्या पतीला मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 30) सायंकाळी साडेसहा शिवराज नगर, रहाटणी येथे घडली.

रवी संघाई (रा. पार्कस्ट्रीट सोसायटी, वाकड) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आरोपीकडे काम करत होत्या. त्यांनी त्यांच्या कामाचे पैसे आजच्या आज देण्याची मागणी केली. त्याचा राग आल्याने आरोपी रवी याने महिलेच्या पतीला शिवीगाळ करून कानशिलात लगावली. ‘मी सर्व मॅटर चार लाखांमध्ये मॅनेज करतो’ अशी धमकी दिली.

त्यानंतर पीडित महिलेने आरोपीकडे विचारणा केली असता त्याने महिलेशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. तसेच महिलेला अश्लील शिवीगाळ केली. आरोपी रवी याने ‘तुम्हा दोघांना बघून घेतो’ अशी धमकी दिली.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.