Rahatani Crime News : एकाच जागेची दोन वेळा विक्री, 40 लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – एका व्यक्तीने एकच जागा पूर्वी एका व्यक्तीला विकली असल्याचे न सांगता त्याच जागेच पुन्हा विक्री करून 40 लाखांची फसवणूक केली. ही घटना 16 मार्च ते 11 ऑगस्ट या कालावधीत घडली.

हेमंत रोहताससिंग चौधरी (वय 37, रा. रहाटणी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत सोमनाथ अशोक तांबे (वय 35, रा. थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे भागीदार हनुमंत पवने, प्रफुल्ल पाठारे व विनायक कलाटे यांना आरोपीने रहाटणी येथील सर्वे नंबर 18/13/3 ही जमीन पूर्वी दुस-यास विकली असल्याचे सांगितले नाही. जमीन विकल्याचे न सांगता आरोपीने तीच जमीन पुन्हा फिर्यादी आणि त्यांच्या भागीदारांना विकली. त्यापोटी आरोपीने धनादेशाद्वारे 40 लाख रुपये घेतले. याबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.