BNR-HDR-TOP-Mobile

Rahatani : वाईट विचार मनांतून डिलिट करा – बी. के. शिवानी

207
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – आपण जे ऐकतो, बघतो आणि वाचत असतो. त्याचप्रमाणे आपले विचार बनतात. जे विचार करतो, त्याचप्रमाणे आपले भाग्य बनत असते. वाईट विचार मनांतून डिलिट करा, असे मत नारी शक्ती पुरस्कार प्राप्त झालेल्या आंतराराष्ट्रीय ख्यातीच्या वक्त्या ब्रह्माकुमारी शिवानी दीदी यांनी रहाटणीत केले.

वर्ल्ड रिन्युअल स्प्रिचुयल ट्रस्टद्वारे रहाटणी येथे कम्युनिटी रेडिओ ”पुणेरी आवाज” याच्या उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी माऊंट आबू वरून करुणा भाई, यशवंत भाई, उद्योजक कृष्णकुमार गोयल, ब्रह्माकुमारी उर्मिला दीदी, बी.के. नरेश भाई, चंद्रकांत नखाते, बी.के.रमेश भाई, वर्षा दीदी आदी उपस्थित होते.

  • यावेळी त्या पुढे म्हणाल्या, आपण मनाला ज्या सूचना करतो. मन त्याचप्रमाणे चालत असते. ज्याप्रमाणे शरीराची, घराची आपण सफाई दररोज करतो, तशी मनाची देखील रोज सफाई केली पाहिजे. ज्या वाईट आणि दुःखद घटना आहेत. त्यांना मनातून डिलीट करा. अनेक वर्षापासून जपून ठेवल्यामुळेच त्याची आठवण झाली की त्रास होतो.

आज एकामेकांच्या कटू वचनामुळेच जगाचे वातावरण दूषित झाले आहे. घरातील वातावरण बनविणे हे आपल्याच हातात आहे. चिंता सोडून सकारात्मक विचारांची जोपासना करा. त्याचा परिणाम घरातील इतरांवरही चांगले संस्कार होईल. आंनदी राहणे, आनंद देणे हाच आपला विचार असला पाहिजे.

  • करुणा भाई यांनी सांगीतले, या रेडिओद्वारे लोकांना सकारात्मक विचार ऐकण्याची संधी मिळेल, अनेक कलावंताना आपली कला सादर करता येईल. पुणे जी.पी.ओ. सेवा केंद्राच्या संचालिका उर्मिला दीदी यांनी शुभेच्छा वक्त करून ”खुश रहो और खुशिया बाटो” हा उपस्थितांना संदेश दिला.

.

HB_POST_END_FTR-A1
HB_POST_END_FTR-A3