Rahatani : दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

एमपीसी न्यूज – गुणवंत विद्यार्थ्यांना आस्की कॉम्प्युटर इन्स्टियुट, मॉडर्न कॉम्प्युटर इन्स्टिटयुट आणि आस्कती कोचिंग क्लासेस यांच्या वतीने दहावी, बारावी तसेच एमएससीआयटीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार सोहळा आणि पारितोषिक वितरण समारंभ रहाटणीतील थोपटे लॉन्स येथे पार पडला.

यावेळी कादी व ग्रामोद्योग महामंडळाचे उपाध्यक्ष डॉ. हेमंत तापकीर, , नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष बाबासाहेब तापकीर, उत्तर भारतीय सभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जय प्रकाश सिंह, नगरसेविका सविता खुळे, नगरसेविक नाना काटे, हरेश तापकीर, मच्छिंद्र तापकीर, माजी नगरसेवक कैलास थोपटे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका निर्मला कुटे, नीता पाडाळे, धनराज बिर्दा, भाजपचे युवा मोर्चाचे पिंपरी-चिंचवड विधानसभेचे अध्यक्ष राज तापकीर, व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार ओझा आदी उपस्थित होते.

  • यावेळी आदर्श मुख्याध्यापक व मुख्याध्यापिकांचाही सत्कार करण्यात आला. त्यात आदर्श मुख्याध्यापक व मुख्याध्यापिकामध्ये गीता पिल्ले, संतोष लोकरे, गीता जोशी, धर्मराज पाल, राधेश्याम मिश्रा, बाबु बल्लाळ, उर्मिला शर्मा, गणपत काळे, सोनटक्के कुमार हिंदराव, अश्विनी बाविस्कर, रामेश्वर पवार, आयुषय गुप्ता यांचा सत्कारामध्ये समावेश आहे.

हेमंत तापकीर म्हणाले की, शिक्षणाची ज्योत अखंडपणे तेवत ठेवण्याची सर्वांती जबाबदारी असून त्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील असले पाहिजे . गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात प्रवेश गेऊन आपल्यातील कलागुणांना वाव द्यावा. हरेश तापकीर यांनी मनोगत व्यक्त केले. अनिल गुंजाळ यांनी दहावी व बारावीनंतर विद्यार्थ्यांनी काय करावे? याबाबत मार्गदर्शन केले. संतोष कुमार ओझा यांनी प्रास्ताविक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.