Rahatani : लग्नाच्या आमिषाने तरुणीवर लैंगिक अत्याचार; संशयित आरोपीवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – लग्नाच्या आमिषाने तरुणीवर लैंगिक अत्याचार करत तिला मारहाण करण्यात आली. ही घटना शनिवारी (दि. 12) रहाटणी येथे उघडकीस आली.

_MPC_DIR_MPU_II

याबाबत 22 वर्षीय तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. स्वप्नील दादा शिंदे (वय 25, रा. टाकळी, कर्जत, अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी स्वप्नील याने फिर्यादी तरुणीला लग्नाचे अमिष दाखवले. तिला साईदीप लॉज, जगताप डेअरी, दत्तनगर परिसरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच, पैशाच्या कारणावरून तिला हाताने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. तरुणीच्या कान आणि नाकातील सोन्याचे दागिने व पाच हजार घेऊन रुपये स्वप्नील पळून गेला, असे पिडित तरुणीने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1