Rahatani : शेती पंपासाठी लागणारे साहित्य बनवणाऱ्या कंपनीत आग

एमपीसी न्यूज- शेती पंपासाठी लागणारे साहित्य बनवणाऱ्या कंपनी रविवारी (दि. 6) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत जळून खाक झाली. ही घटना रहाटणी येथे घडली.

लीडिंग फायरमन अशोक कानडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राणी चौक येथील महालक्ष्मी हाइट्स या इमारतीला आग लागल्याची माहिती मिळताच रहाटणी येथील अग्निशामक बंब थोड्याच वेळात घटनास्थळी दाखल झाला. त्यानंतर संत तुकारामनगर पिंपरी येथील अग्निशामक मुख्यालयातून आणखी दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. मात्र आगीचे स्वरूप लक्षात घेता प्राधिकरण निगडी आणि भोसरी येथील अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर इमारतीच्या टेरेसवर लागलेली आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलास यश मिळाले. इलेक्ट्रिकल शॉर्टसर्किटमुळे आग लागली.

महालक्ष्मी हाइट्स या इमारतीच्या टेरेसवर लाजी कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून अनधिकृतपणे शेतीपंपासाठी लागणारी उपकरणे २०१४ पासून तयार करण्यात येत होती. या कंपनीत पंधरा कामगार कामाला आहेत मात्र सुरक्षा विषयक अग्निशामक उपकरणे येथे बसवण्यात आलेली नव्हती. तसेच अरूंद रस्त्यामुळे आग विझविण्यात अडचणी येत होती.

अग्निशामक अधिकारी अशोक कानडे, लेडींग फायरमन अशोक इंगवले, फायरमन संभाजी अवतारे, श्रीकांत वैरागर, किरण निकाळजे, विठ्ठल घुसे, सुरज गवळी, नामदेव मेत्रे, रामदास गाजरे, अवधूत अल्लाट, अनिल माने, शंकर पाटील, विलास कडू, दिनेश इंगळकर, प्रतीक कांबळे, महेंद्र फाटक, संभाजी दराडे, वाहन चालक सचिन साखरे, विशाल बाणेकर, प्रदीप हिले, पद्माकर बोरवके, दिनेश येलवे, फिटर ढमढेरे, आणि इतर तीस ते पस्तीस कर्मचारी यांनी ही कार्यवाही केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.