Rahatani : रहाटणी चौक ते स्मशानभूमी पर्यंतच्या रस्त्याचे भूमिपूजन

एमपीसी न्यूज – रहाटणी पिंपळे सौदागर येथील रहाटणी चौक ते स्मशानभूमी पर्यंतच्या रस्त्याचे यु.टी.डब्लु .टी पद्धतीने काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांच्या हस्ते करण्यात आले.

या भूमिपूजनप्रसंगी नगरसेविका शितल काटे,सुदाम काटे,शिवशंभो सेवा मंडळाचे अध्यक्ष संपत मेटे, माउली हांडे, विलास काटे,पोपट जगताप, अर्जुन काटे, सूर्यकांत काटे, राजू हांडे, अजय माकनीकर, बाळासाहेब भुंडे, संदीप काटे, पिंपळे सौदागर विठ्ठल रुक्मिणी वारकरी सस्थेचे अध्यक्ष संदेश काटे, सुभाष वाणी,  अॅड. प्रसन्न लोखंडे, सागर भिसे, पंकज काटे, तसेच यावेळी पिंपळे सौदागरमधील ग्रामस्थ, जेष्ट नागरिक व शिवशंभो सेवा मंडळाचे व विठ्ठल रुक्मिणी वारकरी संस्थेचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते.

हा रस्ता हा यु.टी.डब्लु .टी पद्धतीने स्मार्ट सिटी सूचनेनुसार बनवण्यात येणार आहे. या रस्त्याचे काम हे रहाटणी शिवाजी चौक ते महादेव मंदिर १८ मीटर रुंद व महादेव मंदिर ते स्मशानभूमीपर्यंत ३० मीटर रुंदीच्या या डी.पी रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या रस्त्याची लांबी ८५० मीटर इतकी आहे.

या रस्त्यासाठी अंदाजित खर्च ८ कोटी रुपये इतका आहे. या रस्त्याचे काम मे.पी.सी.सी.इन्फ्रा.प्रा.लि. हि कंपनी करणार आहे. या रस्त्याचे काम हे नोव्हेंबर २०२० पर्यंत पूर्ण होणार आहे. .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like