Rahatani News : सतरा वर्षीय मुलीवर अनोळखी इसमाकडून बलात्कार, पाणी पिण्याच्या बहाण्याने घुसला घरात

एमपीसी न्यूज – पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसून, अनोळखी इसमाने सतरा वर्षीय मुलीवर जबरदस्तीने बलात्कार केला. त्यामुळे सतरा वर्षीय मुलगी गरोदर राहिली. फेब्रुवारी 2022 च्या पहिल्या आठवड्यात रहाटणी परिसरात ही घटना घडली.

पीडित मुलीच्या आईने याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून 25 वर्षीय अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची सतरा वर्षीय मुलगी घरात एकटी असताना, आरोपी इसम पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसला.

आरोपीने मुलीला मिठी मारून तोंड दाबून, आवाज केल्यास जीवे मारून टाकीन अशी धमकी दिली. आणि जबरदस्तीने मुलीवर बलात्कार केला. त्यामुळे ती गरोदर राहिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.