Rahatani : शिवीगाळ केल्याच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी; परस्परविरोधी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – शिवीगाळ केल्याच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी झाली. ही घटना रहाटणी येथे घडली. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.

नसरीन सलीम ऊर्फ अन्वर शेख (वय 36, रा. पवनानगर, काळेवाडी) यांनी बुधवारी (दि. 9) याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार फरिदा शब्बीर शेख, खैरनुसीय फजल शेख, सना अमिन शेख, अल्ताफ शब्बीर शेख, इरफान शब्बीर शेख, अमिन फाजल शेख (सर्व रा. साई कॉलनी, रहाटणी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास फिर्यादी यांचे दुसरे पती सलीम ऊर्फ अन्वर शेख आणि त्यांचे मित्र फिरोज शेख आणि सादीक शेख हे फिर्यादी यांना शिवीगाळ का केली? याचा जाब विचारण्यासाठी गेले होते. त्यांना आरोपींनी आपसांत संगनमत करून शिवीगाळ करीत लाकडी दांडक्‍याने मारहाण करून जखमी केले. याबाबत अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने करीत आहेत.

तर, याच्या परस्परविरोधी फिर्याद एका 35 वर्षीय महिलेने दिली आहे. अन्वर शेख, सादीक शेख, बबल्या शेख, हसुन शेख (सर्व रा. पवनानगर, काळेवाडी) हुसेन शेख याचा मित्र (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी महिलेच्या घरावर दगड मारले. घराबाहेर उभ्या असलेल्या फिर्यादी यांच्या भावाच्या रिक्षाची तोडफोड केली. तसेच फिर्यादी यांना शिवीगाळ करीत हाताने मारहाण केली. याबाबत अधिक तपास सहाय्यक निरीक्षक वीरेंद्र चव्हाण करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like