Rahatani : विनाकारण दुचाकीची तोडफोड करून तरुणाला मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – काहीही कारण नसताना एका तरुणाच्या दुचाकीची तोडफोड करण्यात आली. याबाबत मित्रांसह विचारणा करण्यासाठी गेले असता तिघांनी त्यांना मारहाण करून चावा घेतला. ही घटना रहाटणी येथे घडली.

अमोल राठोड (रा. शिवराजनगर, काळेवाडी-रहाटणी), राहूल व सागर (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. गिरीश तुळशीदास सावंत (वय 34, रा. शिवराजनगर, काळेवाडी-रहाटणी) यांनी शुक्रवारी (दि. 4) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. 3) सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास आरोपी अमोल राठोड याने फिर्यादी सावंत यांच्या डोळ्यावर मारहाण केली. तसेच त्यांच्या दुचाकीवर दगड घालून तोडफोड केली. याबाबत फिर्यादी सावंत आणि त्यांचे मित्र पवन डेरे व कल्पेश हे जाब विचारण्यासाठी गेले असता आरोपींनी आपसांत संगनमत करून आरोपी राठोड याने फिर्यादी यांना लाकडी दांडक्‍याने मारहाण केली.

आरोपीच्या दुसऱ्या साथीदाराने पवन डेरे यांच्या हाताचा चावा घेतला. तसेच तिसऱ्या आरोपीने सावंत यांच्या डोक्‍यात रॉडने मारहाण केली. फिर्यादी यांचा मित्र कल्पेश सोडविण्यासाठी आले असता त्यांनाही लाथा बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. सहाय्यक निरीक्षक महेश स्वामी याबाबत अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.