_MPC_DIR_MPU_III

Rahul Dravid : हरभजन सिंग म्हणतो राहुल द्रविड उत्कृष्ट झेलपटू, शेयर केला खास व्हिडिओ

Harbhajan Singh says Rahul Dravid is the best catcher, shared special video द्रविडने फलंदाजाच्या नजीक फिल्डींग करत अनेक नेत्रदीपक झेल टिपले.

एमपीसी न्यूज – ‘द वॉल’ म्हणून प्रसिद्ध असलेला माजी भारतीय क्रिकेटर राहुल द्रविड हा फक्त उत्कृष्ट फलंदाज न्हवता तर तो उत्कृष्ट क्षेत्ररक्षण देखील करायचा. राहुल द्रविड याने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करत घेतलेल्या झेलचा व्हिडिओ फिरकीपट्टू हरभजन सिंगने सोशल मिडिया वर टाकला आहे. 

_MPC_DIR_MPU_IV
राहुल द्रविडचा फलंदाजाच्या जवळच्या क्षेत्रात फिल्डींग करण्यात हातखंडा होता. स्लिपपासून ते शॉर्ट-लेग आणि सिली पॉइंटपर्यंत सगळ्या ठिकाणी द्रविडचा दबदबा होता. जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फिल्डर्सपैकी एक अशी राहुल द्रविडची ख्याती होती. द्रविडने फलंदाजाच्या नजीक फिल्डींग करत अनेक नेत्रदीपक झेल टिपले. द्रविडच्या याच अफलातून झेलांचा एक व्हिडीओ फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने पोस्ट केला आहे.

दरम्यान हरभजन च्या पोस्ट वर प्रतिक्रिया आकाश चोप्रा यांनी सुद्धा राहुल द्रविडचे कौतुक केले आहे. तसेच आर अश्विनने सुद्धा या व्हिडिओ वर ‘वॉव’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.
_MPC_DIR_MPU_II

 

विझडेन इंडिया’ने सोशल मीडियावर घेतलेल्या पोलमध्ये राहुल द्रविड गेल्या 50 वर्षातला भारताचा सर्वोत्तम कसोटीपटू ठरला आहे. विझडेन इंडियाच्या सोशल मीडिया पेजवर घेण्यात आलेल्या या पोलमध्ये अकरा हजार पेक्षा जास्त लोकांनी आपली मतं नोंदवली. यात 52 टक्के लोकांनी राहुलच्या पारड्यात आपलं मत टाकलं. तर 48 टक्के लोकं ही सचिनच्या बाजूने होती.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.