_MPC_DIR_MPU_III

Rahul Gandhi News : राहुल गांधींचे ‘हे’ ट्विट होत आहे व्हायरल

एमपीसी न्यूज: राहुल गांधींनी आज केलेले एक ट्विट समाजमाध्यमांवर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहे. ‘जास्तीत जास्त हुकूमशाहांची नावे M पासूनच का सुरू होतात ? मार्कोस, मुसोलिनी, मुबारक, मुशरफ अशा हुकूमशाहांची नावे त्यांनी या ट्विटमध्ये दिली आहेत.

_MPC_DIR_MPU_IV

हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, अहिंसेचे पुजारी असलेले मोहनदास करमचंद गांधी जगात प्रसिद्ध आहेत. त्यांचे नावदेखील M पासून सुरू होत आहे. त्याबद्द्ल राहुल यांचे काय मत आहे?, असे मी त्यांना विचारले आहे.

याबरोबरच वेगवेगळे मीम्सदेखील समाजमाध्यमांवर व्हायरल होऊ लागले आहेत. राहुल गांधींचे ट्विट आणि बरोबर M पासून नाव असलेले माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, मोतीलाल नेहरू, ममता बॅनर्जी, मुलायम सिंह यादव अशी नावे नेटीझन्स ट्विट् करताना दिसत आहेत.

_MPC_DIR_MPU_II

इतकेच नव्हे तर काहींनी राहुल यांना चक्क सोशल मीडिया टीम बदलण्याचा सल्लादेखील दिला आहे.

 

 

 

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.