Rahul Gandhi on China: आमची सत्ता असती तर चीनला बाहेर फेकून द्यायला 15 मिनिटंही लागली नसती- राहुल गांधी

एमपीसी न्यूज – आमचे सरकार असते तर चीनला बाहेर फेकून द्यायला 15 मिनिटंही लागली नसती, अशा प्रकारचे वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज हरियानामध्ये केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘भित्रा पंतप्रधान’ अशा संभावना देखाली त्यांनी केली. चीनने भारताची जमीन बळकावूनही एक इंच जमिनीवर देखील चीनचे अतिक्रमण नसल्याचे आपले पंतप्रधान सांगत आहेत, असे ते म्हणाले.  

_MPC_DIR_MPU_II

जगात फक्त भारत हा असा एकमेव देश आहे की, ज्याची जमीन दुसऱ्या देशाने बळकावली आहे. हे कसले ‘देशभक्त’ पंतप्रधान, असा शेरा देखील राहुल गांधी यांनी मारला.

चीनमध्ये एवढी हिंमत नव्हती की त्याने भारतात एक पाऊल टाकावे, पण भित्रा पंतप्रधान असल्याने चीनची सेना भारतात घुसली आहे, असे ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.