Rahul Gandhi : मोदी आडनाव बदनामी प्रकरणात राहुल गांधीना दोन वर्षाची शिक्षा

एमपीसी न्यूज : मोदी आडनावावरून विनोद करणं राहुल गांधींना भोवलं आहे. 2019 मध्ये मोदी आडनावावरून केलेल्या वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी काँग्रेस खासदार (Rahul Gandhi) राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. सूरत कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे.
Pune News : पुणे पोलिस शिपाई चालक पदाच्या पात्र उमेदवारांची लेखी परिक्षा रविवारी
राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावावरून टीपण्णी केली होती. याच प्रकरणात त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. यामुळे त्यांची खासदारकी धोक्यात येऊ शकते. या प्रकरणी त्यांना जामिनही मंजूर केला आहे. या खटल्याच्या सुनावणीवेळी राहुल गांधी स्वत: कोर्टात उपस्थित होते.