Chinchwad : अपक्ष राहुल कलाटे यांना ‘बॅट’ चिन्ह

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविणारे शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांना ‘बॅट’ चिन्ह मिळाले आहे. भाजपचे लक्ष्मण जगताप यांचे कमळ तर बहुजन समाज पार्टीचे राजेंद्र लोंढे यांचे हत्ती चिन्ह आहे.

_MPC_DIR_MPU_II

अपक्ष उमेदवारांना अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी चिन्हाचे वाटप होते. त्यानुसार आज (सोमवारी) अपक्ष उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले आहे. त्यामध्ये अपक्ष लढणारे कलाटे यांना ‘बॅट’ चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे चिंचवडमध्ये कमळ की बॅट चालते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बहुजन मुक्ती पार्टीचे एकनाथ जगताप यांना खाट, भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या छायावती देसले यांना हातगाडी, जनहित लोकशाही पार्टीचे नितीश लोखंडे यांना ऑटो रिक्षा, भारतीय राष्ट्रवादी पार्टीचे महावीर संचेती यांना शिट्टी, अपक्ष डॉ. मिलिंदराजे भोसले यांना हेलिकॉप्टर, रवींद्र पारधे यांना कपबशी, राजेंद्र काटे यांना नारळाची बाग आणि सुरज खंडारे यांना संगणक चिन्ह मिळाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.