Pune : स्मार्ट सिटी च्या संचालकपदी राहुल कपूर यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज – केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयातील ‘स्मार्ट सिटीज’चे संचालक राहुल कपूर यांची पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या विशेष उद्देशवहक कंपनीच्या संचालक मंडळावर नामनिर्देशित संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

भारत सरकारच्या अनेक महत्त्वपूर्ण योजना व प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी कपूर यांनी केली आहे. यापूर्वी त्यांनी अर्थमंत्रालयात संचालक म्हणून कार्यभार सांभाळला आहे. तसेच यापूर्वी रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत रेल भूविकास प्राधिकरणाचे सार्वजनिक – खासगी भागीदारी प्रकल्पांवर वित्त संचालक म्हणून नेमणूक वर असताना त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली होती.
संचालक पदाच्या जबाबदारीनुसार कपूर हे स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीनंतर स्मार्ट सिटी विभागाला प्रगती अहवाल सादर करतील. राहुल कपूर यांच्या रूपाने प्रशासकीय सेवेत वरिष्ठ पदांवर काम केलेले एक वरिष्ठ अधिकारी संचालक म्हणून पुणे स्मार्ट सिटी ला मिळाल्याने योजनेच्या कामाला आणखी गती येण्यास मदत होणार असल्याचे स्मार्ट सिटीचे मुख्याधिकारी राजेंद्र जगताप यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.