Global Excellence Award : पुण्याचे राहुल राणे यंदाच्या ग्लोबल एक्सलन्स पुरस्काराचे मानकरी

एमपीसी न्यूज : ब्रँड एम्पॉवर संस्थेद्वारे विविध क्षेत्रात उल्लेखनीय (Global Excellence Award) कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थाना ग्लोबल एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित केले जाते. यामध्ये विविध सेवा पुरविणाऱ्या संस्था, उद्योजक, सामाजिक संस्था, सौंदर्य आणि आरोग्य क्षेत्रातील व्यक्ती अथवा संस्था, क्रीडा, आदरातिथ्य व्यवसाय, स्टार्टअप, ई-कॉमर्स अशा अनेक विभागात कार्यरत व्यक्ती/संस्था यांना पुरस्कार प्रदान केले जातात.

पुरस्काराचे यंदा तिसरे वर्ष असून यंदाचे पुरस्कार सुप्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांच्या हस्ते देण्यात आले. या आधीचे पुरस्कार सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दिक्षित नेने तसेच, रविना टंडन यांच्या हस्ते देण्यात आले होते.

Pimpri News : घोरपडीचा साई सिल्वर संघ ठरला पिंपरी करंडक 2022 स्पर्धेचा मानकरी

क्रीडा विभागात पुण्याचे रोलर स्केटिंगचे प्रशिक्षक आणि स्केटिंग साहित्यातील आघाडीचे उद्योजक राहुल राणे यांना ग्लोबल एक्सलन्स (Global Excellence Award) पुरस्काराने गौरविण्यात आले. राणे यांचा तळेगाव दाभाडे रस्त्यावरील सोमाटणे फाटा येथे अद्यावत स्केटिंग अरेना असून पुण्यातील आणि पुण्याबाहेरचे अनेक खेळाडू येथे प्रशिक्षण घेतात.

राहुल राणे यांचे चार विद्यार्थी शिवछत्रपती पुरस्कार विजेते असून संपूर्ण राणे कुटुंबीय रोलर स्केटिंगशी निगडित साहित्याच्या व्यवसायात गेली अनेक वर्ष यशस्वीरित्या कार्यरत आहेत. यंदाचा पुरस्कार राणे यांना त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील यशस्वी कारकिर्दीसाठी देण्यात आला. राहुल यांनी हा पुरस्कार त्यांच्या मातोश्री रेश्मा राणे आणि पत्नी दिप्ती राणे समवेत स्विकारला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.