Pune : मटका किंग बबलू नायर याच्या जुगार अड्ड्यावर छापा; 63 जणांना अटक

एमपीसी न्यूज – मटका किंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या बबलू नायर याच्या बेकायदेशीरपणे चालू असलेल्या जुगार अड्ड्यावर परिमंडळ एकच्या पोलिसांनी छापा टाकला. छाप्यात एकूण 63 जणांना अटक केली असून त्यांच्याकडून दोन लाख 77 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई शनिवारी (दि.27) रात्री आठच्या सुमारास करण्यात आली.

नासीर माहिद्दीन कुरेशी, संदीप आठवले, बिलाल शेख, ताहीर मोहम्मद अली अन्सारी, हेमंत लोंढे, अकबर बागवान, हर्षद अरुण कांबळे, निलेश निवृत्ती चव्हाण, राहुल लालवानी, अनिकेत इंगवले (सर्व रा. खडकी), यांच्यासह एकूण 63 जणांना ताब्यात घेण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, परिमंडळ एकच्या पोलिसांना मटका किंग बबलु नायर याचा खडकी रेल्वे स्टेशनच्या पाठीमागे साई मंदिर चौक येथे पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीरपणे जुगार अड्डा चालवला जातो, अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार परिमंडळ एकच्या  पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी याठिकाणी स्टाफसह जाऊन छापा टाकला.

छाप्यात 63 जणांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेण्यात आली यामध्ये त्यांच्याजवळून दोन लाख 29 हजार 013 रुपयांची रोख रकम, जुगाराचे साहित्य 45 मोबाईल फोन व इलेक्ट्रिक नोटा मोजण्याची मशिन असा एकूण दोन लाख 77 हजार 513 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी बबलू सबस्टीन नायर याच्यासह एकूण 63 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गिरी करीत आहे. या कारवाईत पोलीस उप आयुक्त स्वप्ना गोरे पोलीस उप निरीक्षक वाय पी सुर्यवंशी, पोलीस हवालदार सचिन इनामदार, पोलीस नाईक जगदाळे, पोलीस नाईक पालवे, पोलीस शिपाई देशमुख, पोलीस शिपाई भोकरे, असे पोलीस उपायुक्त फरासखाना पोलीस ठाण्याच्या तपास पथक यांच्या संयुक्त पथकाने सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.