Pune Crime News : बिबवेवाडीत गावठी दारू अड्ड्यावर छापा, तिघे ताब्यात

एमपीसी न्यूज – पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असणाऱ्या गावठी दारूचा अड्ड्यावर गुरुवारी सायंकाळी छापा टाकला. या ठिकाणाहून 998 लिटर गावठी दारू जप्त केली आहे. या गावठी दारूचा साठा करणाऱ्या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गु‌. र.क्र. 91/22, कलम 65 ई, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कायदा अन्वये नोंद करण्यात आली आहे.

शारदा किसन सोनवणे, (वय 60 वर्षे, रा. झांबरे वस्ती, जगताप डेरीच्या पाठीमागे, बिबवेवाडी कोंढवा रोड, पुणे), अनिल यशवंत गुप्ते (अटक), (वय 28 वर्षे, रा. झांबरे वस्ती, जगताप डेरीच्या पाठीमागे, बिबवेवाडी कोंढवा रोड, पुणे), विजय सिद्धाप्पा कट्टीम्हणी ( वय 24 वर्षे), अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून 39,850/- किंमतीची एकूण 998.5 लिटर गावठी हातभट्टीची दारू व रु. 830/- रोख रक्कम, आता एकुण रु. 40,680/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.