Pune Crime News : बालेवाडी जुगार अड्ड्यावर छापा,28 आरोपींना अटक

एमपीसी न्यूज – बालेवाडी येथे जुगार अड्ड्यावर छापा मारून 28 आरोपींना अटक करण्यात आली असून दिड लाख रुपयांचा एवज जप्त (Pune Crime News) करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.4) बालेवाडी गावातील दसरा चौकात पुणे आयुक्तालयाच्या सामाजिक सुरक्षा विभागाने केली आहे.

Crime News : त्या नराधमाला फाशी द्या- किशोर आवारे; तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन

 

दसरा चौकातील महाराष्ट्र मटण शॉप दुकानाच्या पाठीमागे पत्र्याच्या शेडमध्ये कल्याण व मुंबई मटका जुगार यावर बेकायदेशीररित्या जुगार खेळत होते. यातील 17 अरोपींना अटक करण्यात आली असून 11 आरोपी यांचा शोध पोलीस घेत असून 28 जणांविरोधात गुन्हा (Pune Crime News) दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी आरोपींकडून 8 हजार 950 रुपये रोख, 60 हजार रुपये किंमतीचे 12 मोबाईल,70 हजार रुपयांची दुचाकी व 13 हजार रुपयांचे जुगाराचे साहित्य असा एकूण 1 लाख 52 हजार 50 रुपयांचा एवज जप्त करण्यात आला आहे.याचा तपास पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.