Chinchwad News : पिंपरी-चिंचवड शहरात आठ ठिकाणी अवैध धंद्यांवर छापा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर पोलीस खाते चांगलेच ऍक्शन मूडमध्ये आले आहे. दररोज अवैध धंदयांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. मंगळवारी एकाच दिवसात पोलिसांनी आठ अवैध धंद्यांवर कारवाई केली.

भोसरी पोलिसांनी वेश्या व्यवसाय सुरु असलेल्या तीन लॉजवर कारवाई केली. त्यात पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली आहे.

चाकण येथे दारूभट्टीवर छापा टाकून पोलिसांनी 82 हजार रुपयांची गावठी दारू बनविण्याचे रसायन जप्त केले. अमृत नरबतसिंग राठोड (वय 20, रा. फलके वस्ती, मोई) याच्या विरोधात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सामाजिक सुरक्षा पथकाने पिंपरी परिसरात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. त्यात पोलिसांनी आठ जणांवर गुन्हे दाखल केले. त्या सर्वांना अटक करून पोलिसांनी जामिनावर सोडले आहे. आरोपींकडून जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

निगडी पोलिसांनी कल्याण मटका हा ऑनलाईन जुगार चालणा-या एका जुगार अड्ड्यावर छापा मारला. त्यात पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला. त्यातील दोघेजण मोबाईलवर ऑनलाईन जुगार घेत होते. त्यांच्याकडून 15 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी कुदळवाडी येथे रवी रंजन वजन काट्याजवळ देशी दारू आणि विदेशी बिअर दारू विकणा-या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून तीन हजार 314 रुपये किमतीचा दारूसाठा जप्त करण्यात आला आहे.

शिरगाव पोलिसांनी बेकायदेशीरपणे दारू विक्री करणा-या एकाला अटक केली. त्याच्याकडून टॅंगो पंच कंपनीच्या 260 रुपयांच्या पाच बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.