Raigad: धक्कादायक प्रकार ! रोह्यात 15 वर्षीय मुलीचा दुष्कर्म करून खून

Raigad: Murder of a 15-year-old girl in roha after rape रविवारी सायंकाळपासून ही मुलगी बेपत्ता होती. कुटुंबीयांकडून तिचा शोध सुरू होता.

एमपीसी न्यूज- रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. तांबडी येथे एका अल्पवयीन मुलीवर दुष्कर्म करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी रोहा पोलिस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहा तालुक्यातील तांबडी येथे एका 15 वर्षीय मुलीवर दुष्कर्म करून तिची हत्या केल्याची घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळपासून ही मुलगी बेपत्ता होती. कुटुंबीयांकडून तिचा शोध सुरू होता. सायंकाळी ताम्हणशेत येथील ओहळाजवळ या मुलीचा मृतदेह सापडला.

याबाबतची माहिती रोहा पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरा रोहा पोलिस ठाण्यात याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला.

रोहा पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेचा अधिक तपास रोह्याचे पोलीस उपअधीक्षक किरण सूर्यवंशी हे करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.