Raigad News : पुरातत्व खात्याला दणका; रायगडावरील तिकिटघर शिवप्रेमींनी उलथवून टाकले

एमपीसी न्यूज – तिकीटाच्या नावाखाली शिवप्रेमींकडून पैसे घेतले जातात, मात्र गडावर कुठल्याही सुविधा नाहीत. याच्या निषेधार्थ दुर्गदुर्गेश्वर रायगड येथील पुरातत्त्व खात्याचे तिकीटघर काही शिवप्रेमींनी उलथवून टाकले.

गडावर प्रवेश देण्यासाठी पुरातत्त्व खात्याकडून प्रती माणसी 25 रुपये तिकीटाची रक्कम आकारली जाते. गडावर महादरवाजाजवळ पूर्वी हे तिकीटघर होते. गडाचे संवर्धन कार्य सुरू असले, तरी गडावर कुठल्याही सुविधा उपलब्ध नसल्याने शिवप्रेमींनी तिकिटघर उलथवून टाकले. यावेळी महाडचे आमदार भरत गोगावलेही उपस्थित होते.

रायगडवाडीकडे उतरणाऱ्या खिंडीत चित दरवाजाचा पायरी मार्ग आहे. या पायरी मार्गाची नुकतीच दुरूस्ती करण्यात आली आहे. तिथेच नव्याने हे तिकीटघर उभारण्यात आले होते. मात्र, शिवभक्तांनी ते उलथवून टाकले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.