Lonavala : ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याने रेल्वे सेवा ठप्प

एमपीसी न्यूज – मुंबई-पुणे लोहमार्गावर मंकीहिल ते ठाकूरवाडी दरम्यान डाऊन लाईनवर तिन ठिकाणी ओव्हरहेड वायर शाॅर्ट सर्किट झाल्याने मुंबईहून पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प झाली आहे. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती समजल्यानंतर रेल्वे कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले असून दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.