Railway : आगामी सणांसाठी पुणे- हटिया दरम्यान 10 विशेष रेल्वे

एमपीसी न्यूज – आगामी दिवाळी, छट आणि इतर सणांसाठी (Railway ) मध्य रेल्वेने पुणे- हटिया दरम्यान दहा विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सणांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे-हटिया साप्ताहिक उत्सव विशेष रेल्वे – 10 गाड्या (20 एलएचबी कोच)

02845 साप्ताहिक उत्सव विशेष रेल्वे 03 नोव्हेंबर ते 01 डिसेंबर या कालावधीत (5 ट्रिप) प्रत्येक शुक्रवारी पुणे येथून सकाळी 10.45 वाजता सुटेल ही गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी 03.15 वाजता हटिया येथे पोहोचेल.

PCMC : पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्यात कर्मचाऱ्यांचे योगदान; सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार

02846 साप्ताहिक उत्सव विशेष रेल्वे 01 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर या कालावधीत (5 ट्रिप) प्रत्येक बुधवारी हटिया येथून रात्री 09.30 वाजता सुटेल. ही गाडी तिसऱ्या दिवशी पहाटे 02.45 वाजता पुणे येथे (Railway ) पोहोचेल.

ही गाडी दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपुर, गोंदिया, दुर्ग, रायपुर, बिलासपुर, झारसुगुड़ा, राउरकेला स्थानकावर थांबेल. या गाड्यांचे आरक्षण 2 नोव्हेंबर पासून सुरु होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.