BNR-HDR-TOP-Mobile

Lonavala : लोणावळा रेल्वेस्थानक परिसरात रेल्वेच्या चार वेगवेगळ्या घटनांमध्ये चौघांचा मृत्यू

PST-BNR-FTR-ALL
एमपीसी न्यूज – लोणावळा रेल्वे स्थानक परिसर व लोहमार्ग पोलिसांच्या अंकित रेल्वेच्या चार वेगवेगळ्या घटनांमध्ये  चौघांचा मृत्यू झाला आहे.  या घटना मंगळवारी सकाळी साडेआठ व दुपारी एक, साडेतीन व सायंकाळी पावणेसहाच्या दरम्यान घडल्या असून, पहिली घटना मालगाडी व दुसरी घटना रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक तीन लोकलखाली घडली आहे. तिसरी घटना प्लॅटफॉर्म क्रमांक दोन व तीन दरम्यान तर चौथी घटना कोणार्क एक्सप्रेसमध्ये लोणावळा ते खंडाळा घाटमाथा दरम्यान घडली आहे. 
किशोर सोपान टेमघरे (वय-50, रा. नांगरगाव, लोणावळा) व राजेंद्र शिवलिंग माने (वय-34, रा. अंबरनाथ, ठाणे)  असे रेल्वे अपघाताच्या घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे असून,  दिलीप देवराज स्वाईन (वय-32, कल्याण, ठाणे) असे कोणार्क एक्सप्रेसमध्ये मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तर चौथी व्यक्ती 50 वर्षाची असून तो हॉकर्स असावा अशी शक्यता लोहमार्ग पोलिसांनी वर्तवली आहे. लोणावळा लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किशोर टेमघरे हे कारणास्तव नांगरगाव जवळील रेल्वे यार्डात लोहमार्ग ओलांडत असताना लोहमार्ग किलोमीटर क्रमांक 128/2 जवळ मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मालगाडीची धडक बसल्याने टेमघरे यांचा जागीच मृत्यू झाला. हि घटना मंगळवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या दरम्यान घडली.
तर दुसरी घटना दुपारी एकच्या सुमारास घडली. राजेंद्र माने हे लोणावळा रेल्वेस्थानक परिसरात प्लॅटफॉर्म क्रमांक तीन येथे लोहमार्ग ओलांडत असताना पुण्याहून लोणावळा रेल्वे स्थानकावर येत असलेल्या पुणे लोणावळा लोकलची धडक बसल्याने माने यांचा प्लॅटफॉर्म तीनवरच जागीच मृत्यू झाला आहे. या दोन्ही घटनांचा पुढील तपास लोणावळा लोहमार्ग पोलिस करीत आहे.
HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.