Railway : मध्य रेल्वेला सात महिन्यात सापडले 27 लाख फुकटे प्रवासी

एमपीसी न्यूज – विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर रेल्वे विभागाकडून( Railway ) कारवाई केली जाते. रेल्वे गाड्यांमध्ये तिकीट तपासणी करून तसेच फलाटांवर तिकीट तपासणी करून असे प्रवाशी शोधले जातात. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यात मध्य रेल्वेने 27 लाख 32 हजार फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
चालू वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत विनातिकीट, अनियमित प्रवास, सामान बुक न करण्याची एकूण 27 लाख 32 हजार प्रकरणे उघडकीस आली. अशा प्रवाशांवर रेल्वेकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या फुकट्या प्रवाशांकडून 176 कोटी 17 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही आकडेवारी काहीशी कमी आहे.
मागील वर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत विनातिकीट, अनियमित प्रवास, सामान बुक न करण्याची 29 लाख 16 हजार प्रकरणे उघडकीस आली. या प्रकरणांमध्ये 194 कोटी 87 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
ऑक्टोबर 2023 मध्ये 4 लाख 16 हजार प्रवाशांकडून 26 कोटी 69 लाख तर मागील वर्षी ऑक्टोबर 2022 मध्ये 4 लाख 58 हजार प्रवाशांकडून 31 कोटी 61 लाख रुपये दंड वसूल केला.
रेल्वेने प्रवास करताना तिकीट काढून प्रवास करावा. तसेच अवजड सामान असेल तर त्याचेही तिकीट काढून घ्यावे, असे आवाहन रेल्वे विभागाकडून करण्यात आले ( Railway ) आहे.