Railway News : मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांची गैरसोय; अनेक रेल्वेगाड्या तासंतास रेल्वे स्थानकात अडकल्या

एमपीसी न्यूज – लोणावळा रेल्वे दरम्यान रेल्वे मार्गावरील (Railway News) देखभाल दुरुस्तीची कामे केली जाणार असल्याने रेल्वे विभागाकडून मेगा ब्लॉक घेण्यात आला. यामुळे अनेक रेल्वे गाड्या विविध रेल्वे स्थानकांवर अडकून पडल्या. परिणामी प्रवाशांना नाहक त्रास झाला. काही प्रवाशांनी अर्ध्या रस्त्यातून बसने परत घर गाठले.

गुरुवारी (दि. 11) दुपारी मध्य रेल्वेच्या लोणावळा रेल्वे स्थानकाजवळ देखभाल दुरुस्तीची कामे करण्याचे नियोजित होते. त्यामुळे दुपारी बारा वाजताच्या सुमारास मार्गावरील रेल्वे गाड्या काही काळ थांबवण्यात आल्या. कोयंबतूर एक्सप्रेस (11014) पुणे रेल्वे स्थानकावरून सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास निघाली. ही गाडी तळेगाव स्टेशन येथे थांबवण्यात आली.

तब्बल तीन तास ही गाडी लेट धावली. या गाडीची लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचण्याची नियोजित वेळ दुपारी 1.45 आहे. मात्र ही रेल्वे सायंकाळी 4.45 वाजता पोहोचल्याने प्रवासी चांगलेच हैराण झाले.

मुंबईहून चेन्नईला जाणारी चेन्नई एक्सप्रेस (22159) देखील एक तास उशिराने धावली. ब्लॉक घेण्यात आला असला तरी याचा पुणे लोणावळा लोकल सेवेवर काहीही परिणाम झाला नसल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Maharashtra : आता उद्धव ठाकरेंनी आम्हाला नैतिकता शिकऊ नये – एकनाथ शिंदे

प्रवासी तन्वी वाणी त्यांच्या कामानिमित्त गुरुवारी सकाळी कोयंबतूर एक्सप्रेसने पुण्याहून मुंबईला निघाल्या. तळेगाव येथे रेल्वे थांबवण्यात आली. बराच वेळ झाला तरी रेल्वे पुढे सुटेना. त्यामुळे त्यांनी पुढे जाऊन (Railway News) पाहणी केली असता काही कामगार रेल्वे रुळावर दुरुस्तीचे काम करीत होते.

काही वेळेनंतर रेल्वे मार्ग दुरुस्ती करणारे इंजिन आले. दुरुस्ती होण्यासाठी तीन तासांचा कालावधी लागणार असल्याचे त्यावेळी त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे मुंबईला न जाता तळेगाव मधून पीएमपी बसने थेट पुणे गाठले असल्याचे तन्वी वाणी यांनी सांगितले.

रेल्वे पोलीस संजय तोडमल म्हणाले, लोणावळा रेल्वे स्टेशन येथे ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे दुरुस्तीची कामे केली जात आहेत. रेल्वे मार्गावर दुरुस्ती सुरु असल्याने रेल्वे गाड्या क्रॉसिंगची सुविधा असलेल्या स्थानकांवर थांबवण्यात आल्या होत्या. काम संपल्यानंतर गाड्या मार्गस्थ करण्यात आल्या.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.