Pune : पुणे-लोणावळा मार्गावरील दुपारची एक लोकल महिनाभर धावणार तळेगावपर्यंतच!

देखभालीच्या कामांसाठी तळेगाव-लोणावळा रेल्वे मार्गावर दररोज तीन तास ब्लॉक

एमपीसी न्यूज – पुणे-लोणावळा विभागात रेल्वे रुळांच्या देखभालीचे काम करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत दररोज तीन तास ब्लॉक घेण्यात येत आहे. यामुळे दुपारच्या वेळेतील दोन लोकल पुणे ते तळेगाव आणि तळेगाव ते पुणे या मार्गावर धावणार आहेत. तळेगाव ते लोणावळा या दरम्यान दोन लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

_MPC_DIR_MPU_II

# गाडी क्रमांक 99818 पुणे स्थानकावरून दुपारी 1 वाजता सुटणारी गाडी तळेगाव स्थानकापर्यंतच धावणार आहे.

# गाडी क्रमांक 99813 लोणावळा स्थानकावरून दुपारी 02 वाजता सुटणारी गाडी आपल्या निर्धारित वेळेत तळेगाव स्थानकापासून सुटणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.