Rain Alert : पुणे, कोल्हापूर, पालघर, नाशिक आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी 14 जुलैपर्यंत रेड अलर्ट

एमपीसी न्यूज – भारतीय हवामान खात्याने (Rain Alert) पुणे, कोल्हापूर, पालघर, नाशिक आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी 14 जुलैपर्यंत अतिवृष्टीसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. तर, मुंबईसाठी पुढील 3 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. उल्लेखनीय म्हणजे, महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांत संततधार पाऊस आणि त्याच्याशी संबंधित घटनांमुळे नऊ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. महाराष्ट्र एसडीएमडीच्या म्हणण्यानुसार, 1 जूनपासून एकूण 76 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि राज्यात पावसाशी संबंधित घटनांमुळे तब्बल 838 घरांचे नुकसान झाले आहे.

मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्याने मंगळवारी सकाळी मुंबई आणि उपनगरांना झोडपून काढले आणि काही तासांतच शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले. काही ठिकाणी रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकल गाड्या पाच ते दहा मिनिटे उशिराने धावत असल्याचा दावा काही प्रवाशांनी केला.

Khadakwasala Dam Update: खडकवासला धरण 100 टक्के भरले, 11 हजार क्यूसेकने विसर्ग सुरू

महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत पावसाशी संबंधित घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून काही पूरग्रस्त ठिकाणांहून 95 जणांना बाहेर काढण्यात आले आहे, असे आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अहवालात मंगळवारी सांगण्यात आले. नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF) च्या 13 टीम आणि राज्य आपत्ती रिस्पॉन्स फोर्सच्या तीन टीम्स राज्यातील संवेदनशील जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत.

राज्यातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी (Rain Alert) ओलांडली आहे. कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास आणि गढी नद्यांच्या पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीपेक्षा किंचित खाली आहे. दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) 12 जुलैपासून महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.