Rain in PCMC : शहरात विजांच्या कडकडाटासह पावसाची दमदार हजेरी

Heavy rains with thunderstorms in the city : रात्री साडे आठ वाजलेतरी पावसाचा जोर कायम होता.

एमपीसी न्यूज – यंदाच्या मोसमात राज्यभरात मान्सून व्यापल्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये आज (शनिवारी) पावसाने दमदार हजेरी लावली. शहरातील जवळपास सर्वच भागांना पावसाने चांगलेच झोडपून काढले. संध्याकाळी सात वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली. रात्री साडे आठ वाजलेतरी पावसाचा जोर कायम होता.

राज्यभरात मान्सूनची सुरुवात होऊन देखील पुणे आणि पिंपरी-चिंचवड मध्ये पावसाने दडी मारली होती. उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना अचानक हजेरी लावलेल्या पावसामुळे थोडासा दिलासा मिळाला आहे.

सकाळपासूनच शहरात मोठ्या प्रमाणावर उकाडा जाणवत होता. त्याचबरोबर आकाशात ढगही दाटून आले होते.

शहरात संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास अनेक भागांमध्ये अचानक अंधारुन येऊन जोरदार पावसाला सुरुवात झाली. जोरदार पावसामुळे अवघ्या दहा मिनिटांतच बहुतांश रस्ते जलमय झाले.

रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. तसेच, अचानक आलेल्या पावसाने नागरिक सुखावले आहेत व वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

दरम्यान, पुण्यात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.