Pune : पावसाने वाढविली उमेदवारांची धाकधूक; मतदानाचा टक्का वाढविण्यावर भर

एमपीसी न्यूज – संततधार सुरू असलेल्या पावसामुळे विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. पाऊस काही थांबण्याची चिन्हे नाही. उद्या या निवडणुकीसाठी मतदार होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी उमेदवारांनीही तयारी केली आहे. तशी यंत्रणाच कार्यकर्त्यांची उभारली आहे.
महिनाभरापासून उमेदवारांनी जीव ओतून प्रचार केला. पुणे शहरात थोडा जरी पाऊस झाला तरी, त्याला नद्यांचे स्वरूप प्राप्त होते. हा पाऊसच उमेदवारांचे भवितव्य ठरविणार आहे. मतदान पार पाडण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. 50 टक्के मतदार हा पुणे शहरातील झोपडटपट्टी भागात राहतो. तोच जास्त संख्येने मतदान करतो.
हा मतदार आपल्याकडे खेचण्यासाठी सर्वपक्षीय उमेदवारांनी प्रयत्न केले. आजची रात्र ही खूप महत्वाची आहे. पोलीस अधिकाऱ्यांसह उमेदवारही ‘डोळ्यांत तेल’ घालून काम करणार आहेत. विधानसभा मतदारसंघात आतापासूनच वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.